केरळियन अंडा करी :


साहित्य :

६.......................अंडी ( उकडलेली )
२ ....................कांदे ( बारीक चिरलेले )
२....................टोमाटो ( बारीक चिरलेले )
३...................हिरव्या मिरच्या ( बारीक चिरून )
७/८  ..........लसणीच्या पाकळ्या
२ कप  ......... नारळाचं जाडसर दूध
१ टे स्पू ............ तांदळाच पीठ
१ टी स्पू ......... धणे जिरे पावडर
१/२ टी स्पू..........गरम मसाला
१/२ टी स्पू......... हळद
१/२  टी स्पू........ जिरे
२  टे स्पू .........  खोबरेल तेल
मीठ



कृती :

Shell the boiled eggs and cut them into half.
अंडी सोलून अर्धी कापून घ्या .
एका पसरट कढईत खोबरेल तेल गरम करून त्यात जिरे घाला .
जिरे तडतडले की त्यात लसणीच्या पाकळ्या ठेचून घाला .
मग चिरलेली मिरची आणि कांदा घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परतवा .
नंतर टोमाटो घालून तेल सुटे पर्यंत चांगले परतवा .
हळद , गरम मसाला आणि मीठ घालून २ मिनिटं परतवा .
खमंग वास सुटला की नारळाचं दूध आणि तांदळाचं पीठ घाला .
मध्यम आचेवर ग्रेवी जरा जाडसर होवू द्यावी .
मग त्यावर कापलेली अंडी घाला आणि वरून चिरलेली कोथिंबीर पेरा .

टीप :
१) नारळाचे दूध काढण्यासाठी खवलेले ओले खोबरे मिक्सर मध्ये वाटून ते पिळून त्याचे जाडसर दूध काढावे .
२) नारळ मिळत नसेल तर त्या ऐवजी  मॉल मध्ये ( coconut powder ) मिळते ती साध्या दुधात मिक्स करून वापरली तरी चालेल .
३) तांदळाच्या पिठामुळे चवीत अजिबात बदल न होता ग्रेवी जाडसर होते .


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...