कोलंबी भात

Prawns Pulav - in English


कोलंबी आणि बासमती तांदळाचा स्वादिष्ट पुलाव .
कमी मसाले आणि नारळाच्या दुधामुळे हा पुलाव कमी मसालेदार आणि रुचकर होतो .
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गरमा गरम कोलंबी पुलाव वाढा .






साहित्य : 

१ कप ......................सफेद पाण्यातील कोलंबी ( कवच सोलून आणि आतील काळा दोरा काढून )
२ कप .....................बासमती तांदूळ
१  ........................कांदा ( बारीक चिरून )
२ टे स्पू ................. आले लसून पेस्ट
१ टे स्पू ................. लाल तिखट
१ टी स्पू ...................हळद
१/२ टी स्पू .................. गरम मसाला ( फक्त लवंग , दालचीनी आणि वेलची पावडर  )
1 टी स्पू ....................dhana jeera powder
१ कप .................... नारळाच दूध
३ कप  .................. पाणी
2  टे स्पू ................... तेल
मुठभर ................... कोथिंबीर ( बारीक चिरून )

कृती :


कोलंबीचे कवच काढून मधला काळा दोरा काढून कोलंबी स्वच्छ धुवून घ्यावी .

कोलंबीला हळद , लाल तिखट , गरम मसाला , आले लसून पेस्ट  आणि मीठ लावून १ तासभर ठेवावी .

एका नॉन स्टीक भांड्यात तेल गरम करून कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यावा .

मग कोलंबी घालून सगळे पाणी आटे पर्यंत नीट परतावे .

मग परतवलेली कोलंबी बाजूला काढून त्याचं तेलात नीट धुतलेला बासमती तांदूळ परतावा .

५ / १० मिनिटांनी तांदळाचा खमंग वास आला की कोलंबी , नारळाच दूध आणि पाणी घालून नीट ढवळावे .

वरून झाकण ठेवून २0 ते ३० मिनिटे पुलाव शिजवावा .

गरमा गरम पुलाव वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी आणि सोबत पापड आणि रायते वाढावे .






No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...